Saturday, September 19, 2026
HomeSironchaसिरोंचा येथे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसाण साहेब यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात...

सिरोंचा येथे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसाण साहेब यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/सिरोंचा, १५ जुलै २०२५::- गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवराव किरसाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार पेंटारामाजी तलांडी यांच्या उपस्तिथीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार डॉ. नामदेवराव किरसाण साहेब यांचा वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा परिषद, भगवंतराव माध्यमिक शाळेत शालेय विध्यार्थ्यांना पाठयपुस्तक, पेन, पेन्सिल आणि चॉकलेट वाटून वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले.

तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप केले. त्यानंतर सिरोंचा येतील मुख्य चौकात अन्न – दान करण्यात आले. तसेच तालुका कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस मिठाई वाटूनही उत्सहात साजरा केले.कांग्रेस नेते अविस तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, कृ ऊ बा समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लम,एम. ए. अल्ली, कृ ऊ बा समिती संचालक नागराज इंगीली, शहराध्यक्ष अब्दुल सलाम आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular