Saturday, May 23, 2026
HomeAheriधान उत्पादक, वन हक्क पट्टे धारक शेतकरी बांधवांना प्रती हेक्टरी २०,००० रुपये...

धान उत्पादक, वन हक्क पट्टे धारक शेतकरी बांधवांना प्रती हेक्टरी २०,००० रुपये मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत प्रोत्साहनपर बोनस रक्कम देण्याची मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मा. जिल्हाधिकारी साहेबजिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांना निवेदन,

गडचिरोली/अहेरी, ०९ सप्टेंबर २०२५::- आदिवासी विविध सहकारी संस्था बोरी, तालुका.अहेरी, जिल्हा गडचिरोली येथील वनहक्क पट्टे धारक शेतकरी बांधव धान उत्पादक शेतकऱ्यांना लागवडी खालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी वीस हजार रुपये मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत प्रोत्साहनपर बोनसची रक्कम वितरण करण्याचे आदेश पारित केले होते.

Oplus_131072

त्यानंतर आदिवासी विविधसहकारी संस्थामार्फत नोंदणीकृत असलेल्या पात्र शेतकऱ्यांपैकी अहेरी तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी संस्था बोरी येथील वन हक्क पट्टे धारक 283 शेतकरी बांधव पाच महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे बोनसच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.

त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निवेदन सादर करत यावेळी महेश बाकीवार, रामाजी बद्दीवार, गोपाळा चांदेकर,सुरेश मंचार्लावार, पेंटू अलोणे व वन हक्क पट्टे धारक शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजीचा रोष व्यक्त केले जात आहे.

अहेरी तालुका नोंदणीकृत धान उत्पादक वन हक्क पट्टे धारक शेतकऱ्यांची यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular