Tuesday, September 15, 2026
HomeAheriअहेरी नगरपंचायत कडूनच मिळनार आत्ता विवाह प्रमाणपत्र.. नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांचा पाठपुराव्याला...

अहेरी नगरपंचायत कडूनच मिळनार आत्ता विवाह प्रमाणपत्र.. नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांचा पाठपुराव्याला मिळाले यश…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ०२ नोव्हेंबर २०२५::- अहेरी नगर पंचायतीची स्थापन होहून 10 वर्ष पूर्ण झाल्यावर ही अहेरी शहरातील नागरिकांना महत्वपूर्ण असे विवाह प्रमाणपत्र ( मॅरेज सर्टिफिकेट ) मिळत नव्होते, अहेरी उपजिल्हा रुग्णालयातुन ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खूपच खिचकट प्रक्रिया होती ह्यामुळे अहेरी शहरातील नागरिकांना विवाह प्रमाणपत्र मिळविन्यासाठी मोठी अडचण होत होती, सदर विवाह प्रमाणपत्र नसल्याने नववधूचे आधारकार्ड, इलेक्शन कार्ड, बँक खाते अशी आवश्यक कामे थांबली होती, ह्या बाबत अनेक नागरिकांनी सदर अडचण नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांचा लक्षात आणुन देत अहेरी नगरपंचायत मधूनच जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र प्रमाणेच ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

अहेरी शहरातील जनतेचा ह्या मागणीची तातडीने दखल घेत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांनी अहेरीचे मुक्याधिकारी (C.O.) गणेश शहाणे साहेब तसेच नगरपंचायत प्रशासनाकडे ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली तसेच लगतचा वांगेपल्ली, कोत्तूर चिंचगुंडी ग्रामपंचायतीत ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र दिले जात असतांना अहेरी नगरपंचायत कडून विवाह प्रमाणपत्र का दिले जात नाही..?? असा सवालच सर्वसाधारण सभेत केला ह्याची तातडीने दखल घेत मुख्याधिकारी गणेश शहाणे साहेबांनी यंत्रनेकडे पाठपुरावा करून विवाह प्रमाणपत्र साफ्टवेअर मागवून घेत नुकतेच अहेरी शहरात झालेल्या विवाहची नोंदणी करून ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र अहेरी नगरपंचायत कडून देण्याची सोय उपलब्ध करून दिले असून ह्याचा अहेरी शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक अमोल गुडेल्लीवार ह्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular