VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/ चामोर्शी, ०८ डिसेंबर २०२५::- चामोर्शी येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कथावाचक गुरुवर्य पं. विनोद बिहारी गोस्वामी महाराजांनी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी मार्कंडा देवस्थानाच्या परिसरातील वहीम दृश्य, शांत वातावरण आणि निसर्गरम्य सौंदर्य अनुभवत एक अद्भुत आध्यात्मिक अनुभूती घेतल्याचे सांगितले.
या प्रसंगी पं. विनोद बिहारी गोस्वामी महाराजांच्या सोबत माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, विनोद खोबे, गजानन भांडेकर, सुरेश शहा, रघुनाथ भांडेकर, रवी भांडेकर, जयराम चलाख, राजू मोगरे, उमाकांत जुनघरे, मृत्युन्जय गायकवाड, मोरेश्वर डांगे, मानतेश श्रीरामे, मनोहर मेडपल्लीवर आदी उपस्थित होते. देवस्थानातील पवित्रता, हिरवाईने नटलेला परिसर आणि वाहत्या नदीचा संगीतप्रिय नाद पाहून सर्वांच्या मनात भक्तीभाव, समाधान आणि श्रद्धेची भावना दाटून आली.
मार्कंडेश्वर दर्शनानंतर पं. विनोद बिहारी गोस्वामी महाराजांनी चामोर्शीवासियांसाठी आशीर्वादाचा वर्षाव करत भाविकांना धर्म, भक्ती आणि सदाचार यांचा संदेश दिला. धार्मिक आनंदाने चामोर्शीत वातावरण भारावून गेले आहे.
