Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliयुवकांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा - महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे युवकांना...

युवकांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा – महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे युवकांना आवाहन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

हिरापूर येते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न.

गडचिरोली/हुरापुर,२३ फेब्रुवारी २०२४::- गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येते, युवा क्रीडा कबड्डी मंडळाच्या वतीने भव्य डे – नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते पार पडले.

वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करू असे खोटे आश्वासन देऊन 10 वर्षा आधी भाजपा सरकार सत्तेत आली, मात्र तेव्हा पासून रोजगार निर्मिती तर सोडा पण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे, बेरोजगारीचा दर उच्चाॅंक गाठत असताना, जे काही थोड्या फार परिक्षा झाल्या त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार केल्या जात आहे, मागच्या रस्त्याने काहीना प्रवेश दिला जात आहे, ही सर्वसामान्य बहुजन तरुणांची दिशाभूल असून येणाऱ्या निवडणुकीत तरुणांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला युवकांनी धडा शिकवीला पाहिजे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपल्या उदघाट्नीय भाषणातून केले. पुढे बोलतांना ते म्हणाले भाजप ची नीती म्हणजे खोटे बोला – पण रेटून बोला अशी असून, केंद्रातील नेत्यांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी देखील साफ खोटे बोलतात, ग्रामपंचायत निवडूनुक बिनविरोध केल्यास गावाला बक्षीस देऊ असे स्थानिक आमदार बोलले मात्र, हिरापूर ग्रामपंचायतला 3-4 वर्षाचा कालावधी झालेला असताना देखील अद्याप कुठल्याही प्रकारचा बक्षीस किंवा निधी आमदारांनी दिलेल नाही, त्यामुळे अश्या खोटारड्या लोकप्रतिनिधी ला येणाऱ्या काळात हिरापूरवाशी नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाला युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, जिल्हाउपाध्यक्ष नेताजी गावतुरे,सरपंच शालिनीताई कुमरे, ढिवरू मेश्राम, जावेद खान, मुख्याध्यापक प्रद्या साखरे, सह मोठ्या संख्येने गावकरी, जेष्ठ नागरिक, युवा खेळाडू आणि मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular