Saturday, May 23, 2026
HomeChamorshiस्वप्निल भाऊ वरघंटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...

स्वप्निल भाऊ वरघंटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,चामोर्शी,२३-फेब्रुवारी २०२४::- चामोर्शी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी पहाटे 5.35 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याची ही अकाली एक्झिट धक्कादायक ठरली आहे. खासदार अशोक नेते यांचे ते खूप खंबीर सहकारी होते.

वरघंटे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच खा. अशोक नेते यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना यांना योग्य उपचार मिळण्यासंबंधी सूचना करून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. परंतु हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा पहाटे ५-३५ लाच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. एकदा उमदा, निष्ठावंत, गोरगरिबांच्या मदतीस धावणारा, पक्षाला बळकट करणारा, सहकारी गमावला, सर्वत्र कडून स्व.स्वप्नील वरघंटे यांना आपुलकीची भावना व्यक्त करत श्रद्धांजली देत पूर्ण चामोर्शी शहर दुःख व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular