Saturday, August 1, 2026
HomeAheriअहेरी नगर पंचायतच्या प्रभाग क्र. तीन साठी एक कोटींची निधी...

अहेरी नगर पंचायतच्या प्रभाग क्र. तीन साठी एक कोटींची निधी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन.

गडचिरोली/अहेरी,२७ फेब्रुवारी २०२४::- प्रभाग क्रमांक तीन मधील विकास कामांसाठी येथील नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती.प्रभाग क्रमांक तीनचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल एक कोटी रुपयांची निधी दिली आहे. 

 नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक कोटींच्या निधीतून विकास कामे केली जाणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

या एक कोटींच्या निधीतून सिमेंट रस्ते,नाली बांधकाम तसेच आदी विकास कामे केली जाणार आहे.नुकतेच भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले असून याप्रसंगी नगरसेवक अमोल मुक्कावार,प्रदीप सडमेक,मांतय्या आत्राम,बुधाजी सडमेक,अशोक राव अमनवार,शंकर कटलावार,सुधाकर आत्राम,लक्ष्मीताई येमुलवार,दिलीप सडमेक,दिलीप गणमुकुलवार तसेच या प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular