Monday, June 15, 2026
HomeUncategorizedअहेरी विधानसभा मतदारसंघातील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी २५० एकर जमीन दान दिल्याची...

अहेरी विधानसभा मतदारसंघातील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी २५० एकर जमीन दान दिल्याची चौकशी कधी होणार?…

SURJAGAD ISPAT PVT LTD VADALAPETH

Oplus_131074

गडचिरोली/अहेरी,१२ ऑगस्ट २०२४::- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उचलून धरला मुद्दा गडचिरोली: नक्षलग्रस्तगडचिरोलीमध्येस्थानिक रोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मंत्री धर्मरावबाबाआत्राम यांनीजिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातील त्यांची २५० एकर जमीन सूरजागड इस्पातच्या स्टील प्लांटच्या उभारणीसाठी दानकेली आहे.

माजी जि. प .अध्यक्ष अजय कंकडालवार,

पुढाऱ्यांचे जमीन घोटाळे महाराष्ट्रातील जनतेला नवे नाहीत. राज्यातील मंत्र्यांवर व नेत्यांवर जागा हडपल्याचे आरोप-प्रत्यारोप होतच असतात.

मात्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यास अपवाद ठरले आहे. त्यांनी स्वतःची २५० एकर जमीन एका प्रकल्पासाठी दान केली आहे१७ ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

Oplus_131104

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी वडलापेठ येथील २५० एकर जमीन दान दिली नसुन स्वतःच्या जमीनीसोबत काही गावकऱ्यांची जमीन लिजवर दिली असून काही अतिक्रमण जमीन भूमापन क्र.७४,७५ तील सन २०२०/२०२१ मध्ये आपल्या भावांच्या नावाने नोंदणी केलेली आणि अवैध बांधकाम सुद्धा केले आहे.

२/७/२०२१ ला वडलापेठतील गावकऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार सुधा केली होती मात्र संबंधित प्रशासना कडून याची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही करिता याची चौकशी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी निवेदनातून केली आहे.

वडलापेठ तलाव,

सदर माहिती संदर्भात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular