
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/लखमापूर बोरी, ११ नोव्हेंबर २०२४::- चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी गावच्या पूर्व दिशेस असलेल्या दिवाकर बारसागडे यांच्या घरा पासून गावातील घरावरून सरस्वती राईस मिल कडे जाणाऱ्या विद्युत तारांमूळे नवीन घर बांधणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत असून नाहक त्रास सहन करावा लागतं आहे.
सहा वर्षा अगोदर सदर विद्युत तारा मधून विद्युत प्रवाह वाहत असताना जिवंत ताराखाली शौचालय बांधकाम करणाऱ्या गावातील एका युवक मजुराच्या हातातील लोखंडी सलाख ताराला स्पर्श केल्यामुळे शॉक लागून युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांनतर काही दिवसांनी त्या तारांमधून विद्युत प्रवाह कायमचे खंडित करण्यात आले असले तरी त्या तारा ह्या गावातून गेले असून खाली झुकलेले आहे व या तारांमूळे नवीन घर बांधणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. तारा काढण्यासाठी गावातील युवक दिलखुश बोदलकर व नागेंद्र बोदलकर यांनी भेंडाळा व चामोर्शी येथील महावितरण विभाग कार्यालयात जाऊन दोनदा अर्ज दिले असून गावातील लाईनमॅन ला तोंडी तक्रार केली असता संपूर्ण महावितरण विभागातील कर्मचारी झोपेत असून तारा काढण्याकडे दुर्लक्ष्य करताना आढळून येत आहे. तरी ह्या तारा लवकरात लवकर काढून देण्यात यावी अशी गावकऱ्यानी महावितरण विभागाकडे मागणी केली आहे.
