Saturday, May 23, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी,२२ डिसेंबर २०२४::- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे २० डिसेंबर २०२४ रोज शुक्रवारला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथील पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक अशोक जुवारे सर,जगदीश कळाम सर, राजकुमार कुळसंगे सर, चंद्रकांत वेटे सर, कमलाकर कोंडावार सर,सोनी संदोकार मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे प्रमुख उपस्थितीत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

पुण्यतिथी निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक राजकुमार कुळसंगे,जगदीश कळाम सर यांनी आपल्या भाषणातुन थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगे महाराज यांनी लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून दुर करुन समाज प्रबोधन केले असे प्रतिपादन केले.

आजच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर होते.विशेष अतिथी म्हणुन अशोक जुवारे सर,जगदीश कळाम सर, राजकुमार कुळसंगे, चंद्रकांत वेटे सर, कमलाकर कोंडावार सर,सोनी संदोकार मॅडम आदी मान्यवर लाभले होते. सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांचे हस्ते थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर,राजकुमार कुळसंगे सर,जगदीश कळाम सर यांनी आपल्या भाषणातुन थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या जिवनकार्याची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिली.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार कुळसंगे सर व आभारप्रदर्शन कमलाकर कोंडावार सर यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular