Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliमाजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते नवेगाव...

माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते नवेगाव येथील प्रवासी निवारा शेड चे लोकार्पण…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०९ मे २०२५::- स्व. गजानन खंगार यांचे स्मृती प्रितर्थ नवेगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच राजूभाऊ खंगार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वखर्चातून प्रवासी निवारा शेड ची उभारणी करण्यात आली. निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिल्याने स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केले. याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते निवाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी वासेकर, माजी सभापती मारोतराव इचोडकर, सरपंच दशरथ चांदेकर, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, लौकिक भाऊ भावापुरे, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, सामाजिक कार्यकर्ते मोहनजी ठाकरे, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular