Monday, May 25, 2026
HomeGadchiroliधरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान व छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या...

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान व छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जनतेला वेळेत होतो विविध योजनांचा लाभ – भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. डॉ. देवराव होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

कार्यक्रमाचे उदघाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते,

गडचिरोली, २५ जून २०२५::- महसूल विभागाच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान व छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दिनांक 24 जुन मंगळवारी आयोजित करण्यात आले. या शिबिराला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न करण्यात आले.

या शिबिरात विविध पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्रातील महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करणे हा आहे असून यामुळे नागरिकांना वेळेत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रे मिळत असतात त्यामुळे लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे सोयीचे होत आहे. प्रशासनाने प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ होण्यासाठी गतिमानतेने कार्य करावे जेणेकरून कोणताही पात्र नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन डॉ. देवराव होळी यांनी केले.

या अभियानाअंतर्गत, विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जातो. यात उत्पन्न, रहिवास, जातीचे दाखले, रेशन कार्डांचे वाटप, तसेच संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या सामाजिक योजनांचा समावेश आहे*.*यावेळी प्रामुख्याने तहसिलदार गडचिरोली श्री. संतोष आष्टीकर, गट विकास अधिकारी श्री. अनिकेत पाटील, नायब तहसिलदार चंदु प्रधान, शाहिद शेख, श्री सोयाम वैद्यकीय अधिकारी, श्रीमती परसा गट शिक्षणाधिकारी व इतर सर्व तालुका कार्यालयाचे प्रमूख उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular