Friday, June 5, 2026
HomeGadchiroliमाता कन्यका सभागृहात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात...

माता कन्यका सभागृहात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती,

गडचिरोली ,१३ एफ्रिल २०२६::- येथील माता कन्यका सभागृहात श्री कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठापना सोहळा आर्य वैश्य कोमटी समाजा तर्फे आयोजित करण्यात आला. या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमास माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

या प्रसंगी आयोजकातर्फे माजी आमदार डॉ. होळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

सोहळ्यानंतर भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यात विविध सामाजिक विषयांवर सखोल चर्चा झाली. यामध्ये स्थानिक विकास, सामाजिक प्रश्न तसेच जनतेच्या समस्यांवर उपाययोजना याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

या कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular