VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
आचारसंहिता लागू झाल्याने २९ सप्टेंबरचा रोजगार मेळावा पुढे ढकलला; नवीन तारीख स्वतंत्रपणे जाहीर होणार,
गडचिरोली, 25 सप्टेंबर 2026::- सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आला आहे. याबाबत भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी माहिती दिली आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, नोकरीसाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच संभाव्य रोजगारदात्यांशी संवादाची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार होती. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दि. २९ सप्टेंबर रोजी होणारा रोजगार मेळावा स्थगित झाल्याची नोंद जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
— प्रा. रमेश बारसागडे
जिल्हाध्यक्ष, भाजप गडचिरोली
