VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,११ मार्च २०२४::- भर दिवशा तलवार घेऊन गिरडकर शिक्षकांचे दार थो टावून आम्हाला तुमच्या कुटुंबासहीत जिवे मारण्यासाठी सुपारी दिली आहे तुम्ही बाहेर या असे म्हणत चार पाच ईसमानी जिवे मारण्याची धमकी दिली. या बाबतची रिपोर्ट पोलीस स्टेशन गडचिरोली येथे देवूनही अजुन चौकशी व कारवाई थंड बस्तात आहे. तेव्हा आम्ही जगावे तरी कसे अशी हाक मारून पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती गिरडकर कुटुबियांनी दिली. रविंद्र सखाराम गिरडकर रा. नवेगांव मुरखडा हे व्यवसायाने शिक्षक असुन दि. २९ फरवरीला भर दिवशा चार – पाच गुंड प्रकृतीचे व्यक्ती हातात तलवारी घेऊन गिरडकर शिक्षकांच्या घरी धडकले, तुम्ही बाहेर या आम्हाला एका व्यक्तीने तुमच्या कुटुंबासहीत जिवे मारण्यासाठी पन्नास हजार दिलेत पुन्हा देणार आहे. असे म्हणत धमकावले व जिवे मारण्याची धमकी दिली. आम्ही सांगु त्या नंबरवर फोन करा की आम्हाला मारले म्हणुन,पुन्हा आम्हाला त्याचेकडून रक्कम घ्यायची आहे.कुणाचाही फोन उचलु नका व पोलीसात रिपोर्ट देऊ नका असे धमकावून ते निघुन गेले. सायंकाळी तिनदा गिरडकराना फोन आलेत परंतू सांगीतल्या प्रमाणे फोन उचलला नाही. शेवटी भयभित गिरडकर कुटुबियांनी गडचिरोली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली परंतू गडचिरोली पोलीसांनी कोणतीच चौकशी व कारवाई केली नाही. आलेले गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती फुटेज मधे आहेत त्यांचा मोबाईल नंबरही आहे. घरी आलेत तेव्हा पाढऱ्या रंगाची गाडी क्रमाक MH 34 BR 8773 होती एवढे पुरावे देऊनसुद्धा आजतागायत गडचिरोली पोलिसांची छुपी कश्यासाठी कळायला मार्ग नाही. तेव्हा भयभित गिरडकर कुटुंब म्हणतो की जगायचे कसे, गडचिरोली शहरात दिवसा ढवळ्या अशा प्रकार घडत असेल तर.. आम्हाला न्याय देईल कोण? लवकरात लवकर गुंड प्रवृतीच्या धमकीदारांना पोलीसांनी पकडावे अशी मागणी रविंद्र सखाराम गिरडकर नवेगाव त्यांची पत्नी, मुलगा व शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे शहर अध्यक्ष शरद लोणारे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
