
VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर/सावली ,१२ ऑगस्ट २०२४::- सावली तालुक्यातील हरणघाट येथील प.पुज्य संत मुरलीधर महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याला भेट देऊन परत येतांना व्याहाड खुर्द या ठिकाणी तालुका भाजपा संघटनेची कार्यकारणीची बैठक पार पडली.या बैठकीला वेळेअभावी उपस्थिती होऊ न शकल्याने या बैठकी संबंधीत डॉ.कवठे यांच्या निवासस्थानी भाजपा तालुक्यातील संघटनेबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी मा.खासदार अशोक जी नेते यांनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत पुन्हा संघटनेच्या कामाला लागावे अशा सुचना देत नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अर्जुन भाऊ भोयर,ता.महामंत्री सतिश भाऊ बोम्मावार,ता.महामंत्री सचिन भाऊ तंगडपल्लीवार यांना शुभेच्छा व अभिनंदन करत प्रभावीपणे संघटनेचे तालुक्यात काम करावे असे व्यक्त या भेटी दरम्यान केले.तसेच या प्रसंगी डॉ.षडाकांत कवठे यांनी नॅशनल बँक व्याहाड खुर्द या ठिकाणी होण्यासाठी मा.खा.अशोक जी नेते यांना निवेदन देत चर्चा केली या परिसरात एकच जिल्हा मध्यवर्ती सहकारी को- आँफ बँक असल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे. तसेच शासनाच्या योजनांच्या रक्कमे संबंधीत खुप अडचणीचा सामना करावा लागत आहे.या ठिकाणी नँशनल बँक जर व्याहाड खुर्द येथे झाली तर या परिसरात जनतेला त्रास होणार नाही व याचा फायदा सुद्धा होईल हि अडचण लक्षात आणून देताच लगेचच मा.खा.नेते यांनी मी दिल्ली येथे पत्र व्यवहार करून यावर सकारात्मक विचार होईल अशी ग्वाही यावेळी दिली. या प्रसंगी माजी बांध.सभापती संतोषभाऊ तंगडपल्लीवार, ओबीसी नेते प्रा. सोलोटकर सर,भाजपा युवा नेते तथा ओबीसी चे माजी तालुकाध्यक्ष कविंद्रजी रोहनकर, भाजपाचे नेते निखिल जी सुरमवार,व्याहाड बुजचे ग्रामपंचायत सदस्य तथा मा.खासदार महोदयांचे सोशल मिडीया प्रमुख दिवाकर गेडाम, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
