
VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/अहेरी,१२ ऑगस्ट २०२४::- महागाव बुज येथील रहिवासी मल्लूबाई रामटेके यांचे मातीचे भिंत असलेले कवेलुचे घर सततच्या पावसामुळे कमजोर होवून कोलमडले. अठराविश्वे दारीद्र्य असलेल्या मल्लुबाईवर फार मोठे संकट कोसळले.संसार ऊघड्यावर पडलेल्या मल्लुबाईची परिस्थिती कळताच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांना कळताच तात्काळ आर्थीक मदत पाठवीली आणि मल्लुबाईला तात्काळ शासकिय मदत मिळण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या.महागावचे ऊपसरपंच श्री संजय अलोणे,भाजपचे जिल्हा ऊपाध्यक्ष रवीजी नेलकुद्री तसेच भाजपाचे कार्यकर्ते ऊपस्थित होते.
