Tuesday, September 15, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल) येथे ११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल) येथे ११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, २२ जून २०२५::- तालुक्यातील मुरखळा (माल)येथे शनिवारी २१ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल‌‌‌) च्या प्रांगणात “११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा करण्यात आला. यावेळी ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली मुमडवार, उपाध्यक्ष लोशन रामटेके,सदस्य मोरेश्वर तुंबडे,संगिता सोमनकर, विद्या कनाके, जयश्री बट्टे, संगिता राऊत,ग्राम विकास अधिकारी राजेंद्र बारसागडे,पालक निलकंठ सोमनकर,विजय राजुरवार,यादव पा.बुरे,कल्याणी सोमनकर, नैताम ताई, जिल्हा परिषद शाळा मुरखळा (माल‌‌‌)चे मुख्याध्यापक राजू मडावी,पदवीधर शिक्षक गणेश बोईनवार,शाळेतील पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,

शाळेतील शिक्षक अशोक जुवारे, चंद्रकांत वेटे,जगदिश कळाम, राजकुमार कुळसंगे,अंगणवाडी सेविका सरिता बुरांडे,पुष्पा बुरे,उषा गेडाम,दिकोंडावार ताई,ग्रामपंचायत चे कर्मचारी वृंद शामराव निशाणे,सचिन तुंबडे,राकेश नैताम,मानिक घोगरे,शालेय पोषण आहार मदतनीस पुष्पा मोहूर्ले,नयना मोहूर्ले ,सरिता सरपे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठीत नागरिक,शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत नवागत विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे यांचे हस्ते पुष्पगुच्छ,खाऊ, गणवेश,पुस्तके,बुट व पायमोजे देऊन स्वागत करण्यात आले.

तसेच शाळेतील इयत्ता २ री ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके,गणवेश,बुट व पायमोजे देण्यात आले. “एक पेड माॅ के नाम” या उपक्रमाअंतर्गत शाळेत प्रमुख पाहुणे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

“स्वच्छता अभियान मोहिम” अंतर्गत प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत शाळा बाहेरील परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular