VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
या निमित्ताने मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी मान. डाॅ. उपेंद्रजी कोठेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या,
भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री व संवेदनशील कवी डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या चौथ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन,
नागपूर, २२ जून २०२५ ::- नागपूरसाहित्यिक संवेदनशीलतेचे प्रतीक ठरणारा “नाठाळाच्या माथी” हा डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांचा चौथा काव्यसंग्रह नागपूर येथे अत्यंत साहित्यिक वातावरणात प्रकाशित करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या उमेय दालन नागपुर येथे आयोजित या प्रकाशन समारंभाचे आयोजन साहित्य भारती (विदर्भ प्रांत) यांच्या वतीने करण्यात आले होते. लाखे प्रकाशनद्वारे प्रकाशित या संग्रहात ग्रामीण मनोविश्व, सामाजिक जाणिवा आणि संवेदनशील अनुभवांचे शब्दचित्र उभे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा.खा. डॉ. अशोकजी नेते (राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा) यांनी डॉ. कोठेकर यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात डॉ. नेते यांनी डॉ. कोठेकर यांच्या कवितांमधील सामाजिक समर्पण आणि अंतर्मुख चिंतन याची स्तुती केली.याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,सहकार महर्षी अरविंदजी सा. पोरेड्डीवार,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,सहकार नेते प्रकाशजी सा. पोरेड्डीवार,माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर,ओबीसी नेते भास्कर बुरे,तसेच विदर्भातील अनेक साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या “नाठाळाच्या माथी” या कवितासंग्रहामुळे विदर्भाच्या साहित्यिक क्षितिजावर नव्या आशयांचे आणि भावनांचे सशक्त प्रतिबिंब उमटेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित साहित्यिकांनी व्यक्त केली.
