Friday, June 5, 2026
HomeGadchiroliवाढत्या उन्हामुळे जिल्हा परिषद शाळा सकाळ पाळी घ्या...

वाढत्या उन्हामुळे जिल्हा परिषद शाळा सकाळ पाळी घ्या…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळांची मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे १२ मार्च पासून शाळा भरविण्याचा मागणी,                           

गडचिरोली,०६ मार्च २०२६::- विदर्भातील उष्णतेची वाढती तीव्रता व विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा उन्हाळी कालावधीतील सकाळ पाळीतील शाळा दरवर्षी प्रमाणे दिनांक:-१२ मार्च २०२६ पासुन सकाळ पाळीत भरविण्यात यावी.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर, गडचिरोली तालुका सरचिटणीस श्री संजय मडावी सर यांनी मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन,निवेदन देऊन दिनांक ४/३/२०२६ ला चर्चा केली.

मा.शिक्षणाधिकारी श्री पवार साहेब यांनी यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.असे आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular