Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliपशुसंवर्धन विभागात घोळ,सेवा-ज्येष्ठता डावलून कनिष्ठ अधिकाऱ्याला पदभार...?

पशुसंवर्धन विभागात घोळ,सेवा-ज्येष्ठता डावलून कनिष्ठ अधिकाऱ्याला पदभार…?

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

एससी प्रवर्गातील डॉ. अजय ठवरे यांचा गंभीर आरोप,

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाकडे केली न्यायाची मागणी,

गडचिरोली,०९ जुलै २०२६::- पशुसंवर्धन विभागातील अतिरिक्त कार्यभाराच्या वाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील सेवा-ज्येष्ठ अधिकारी डॉ. अजय ठवरे यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार करत प्रशासकीय अन्यायाचा गंभीर आरोप केला आहे.

नेमके प्रकरण काय 😕

डॉ. अजय ठवरे यांची पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पदावरून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) पदी पदोन्नती झाली आहे. शासनाच्या पदोन्नती आदेशात डॉ. ठवरे हे डॉ. सुधीर मठवाले यांच्यापेक्षा सेवा-ज्येष्ठ आहेत. असे असतानाही, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त या महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. मठवाले यांना देण्यात आला आहे.

डॉ. ठवरे यांचे आरोप :-

१. सेवा-ज्येष्ठतेचे उल्लंघन: शासनाचे पदोन्नती आदेश आणि स्वतःची ज्येष्ठता असतानाही कनिष्ठाची नियुक्ती करण्यात आली.

२. प्रशासकीय अनुभवाकडे दुर्लक्ष: जिल्हा परिषद व्यवस्थेचा प्रदीर्घ अनुभव असूनही त्याची दखल घेतली गेली नाही.

३. प्रक्रियेवर संशय: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचा अभिप्राय न घेता हा प्रस्ताव शासनाकडे कसा पाठवला गेला? असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

चौकशीची मागणी :-

प्रादेशिक संयुक्त आयुक्त (नागपूर) आणि आयुक्त (पशुसंवर्धन, पुणे) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी डॉ. अजय ठवरे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे. आता आयोग यावर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular