Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliखासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षा मोफत पुस्तक वितरण...

खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षा मोफत पुस्तक वितरण कार्यक्रम 19 जुलै रोजी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली ,१३ जुलै २०२६::- गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षेच्या मोफत पुस्तक वितरण कार्यक्रम 14 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमासाठी पुणे येथून मागविण्यात आलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुणे येथे सुरू असलेल्या अति मुसळधार पावसामुळे व वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे नियोजित वेळेत गडचिरोली येथे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सदर कार्यक्रम रविवार, दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता सुमानंद सभागृह, गडचिरोली संपन्न होणार आहे तरी  

स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या सर्व युवक-युवती, विद्यार्थी तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधितांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular