VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
अँड. दुष्यंतभाऊ किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; प्रसिद्ध युवा वक्ते डॉ. विनोद बाबर यांचे मार्गदर्शन,
गडचिरोली, 12 सप्टेंबर 2026::- अँड. दुष्यंतभाऊ किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी, युवक आणि पालकांसाठी ‘करिअर मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आर. के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे हा मेळावा होणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य करिअरची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षा, शिक्षणाच्या विविध संधी, करिअरचे पर्याय तसेच भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध प्रेरणादायी युवा वक्ते व शिवचरित्र अभ्यासक मा. प्रा. डॉ. विनोद बाबर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअर निवड, ध्येय निश्चिती आणि यशासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर मार्गदर्शन मिळणार आहे.
‘स्पर्धा परीक्षा, शिक्षण, करिअरचे योग्य नियोजन आणि यशस्वी जीवन’ या विषयांशी संबंधित महत्त्वपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या मेळाव्यातून मिळणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण आणि विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचा पालक, विद्यार्थी तसेच युवा मित्र-मैत्रिणींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अँड. दुष्यंत नामदेव किरसान मित्र परिवार, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : आर. के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली
दिनांक : रविवार, १३ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ११.०० वाजता
