Friday, September 25, 2026
HomeChamorshi‘माझ्या स्वप्नातील शाळे’पासून ‘विकसित भारता’पर्यंत... विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळाले व्यासपीठ...

‘माझ्या स्वप्नातील शाळे’पासून ‘विकसित भारता’पर्यंत… विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळाले व्यासपीठ…

VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,

लखमापूर बोरी केंद्रस्तरीय चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात,

गडचिरोली /चामोर्शी, 25 सप्टेंबर 2026::-सेवा संकल्प अभियानांतर्गत लखमापूर बोरी केंद्रस्तरीय चित्रकला, निबंधलेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विविध शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना, विचारांना आणि वक्तृत्व कौशल्याला प्रभावीपणे सादर करत स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी ‘माझ्या स्वप्नातील शाळा’, उच्च प्राथमिक गटासाठी ‘निसर्ग वाचवू, भारत घडवू’, तर माध्यमिक गटासाठी ‘माझ्या स्वप्नातील विकसित भारत’ हे विषय देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्रकला, निबंधलेखन आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या कल्पना व विचार मांडले.

स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख प्रदीप भुरसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध हायस्कूल मुरखळा चकचे मुख्याध्यापक अशोक टिचकुले होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, चाकलपेठ शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद उंदिरवाडे, मुख्याध्यापक देवतळे, आत्राम, मेश्राम, भूपेश कुळवे आदी उपस्थित होते.

प्राथमिक गटातील विजेते :-

इयत्ता १ ते ५ या प्राथमिक गटातील ‘माझ्या स्वप्नातील शाळा’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत वैष्णवी सातार (जि.प. उच्च प्राथमिक शाळा जामगिरी) हिने प्रथम, तर अंकित वाळके (प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक) याने द्वितीय क्रमांक पटकाविला.

वक्तृत्व स्पर्धेत रोहित चलाख (प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक) प्रथम, तर वैष्णवी चौधरी (जि.प. उच्च प्राथमिक शाळा चाकलपेठ) द्वितीय ठरली. निबंधलेखनात कृतिका वाडघुरे (जि.प. प्राथमिक शाळा नवेगाव माल) हिने प्रथम, तर ज्ञानेश्वरी बारसागडे (जि.प. प्राथमिक शाळा वाकडी) हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

उच्च प्राथमिक गटातही विद्यार्थ्यांची चमक :-

इयत्ता ६ ते ८ या गटातील ‘निसर्ग वाचवू, भारत घडवू’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत सानवी भोयर (जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा लखमापूर बोरी) हिने प्रथम, तर संजना काकडे (जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा वाकडी जुनी) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.

वक्तृत्व स्पर्धेत कालेश्वर गोहणे (प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक) प्रथम, तर पवन सरपे (लोकमान्य माध्यमिक विद्यालय, मुरखळा माल) द्वितीय ठरला. निबंधलेखन स्पर्धेत माही कुनघाडकर (प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक) हिने प्रथम, तर सक्षम काकडे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा वाकडी जुनी) याने द्वितीय क्रमांक मिळविला.

माध्यमिक गटात ‘विकसित भारता’ची संकल्पना :-

इयत्ता ९ ते १२ या माध्यमिक गटातील ‘माझ्या स्वप्नातील विकसित भारत’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत आचल बावणे (प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक) हिने प्रथम, तर गुंजन पत्रे (लोकमान्य माध्यमिक विद्यालय, मुरखळा माल) हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता वैरागडे (प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक) हिने प्रथम, तर गुंजन पत्रे (लोकमान्य माध्यमिक विद्यालय, मुरखळा माल) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. निबंधलेखन स्पर्धेत सुप्रिया कोसनकर (प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक) प्रथम, तर सलोनी गाडेमोडे (लोकमान्य माध्यमिक विद्यालय, मुरखळा माल) हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.

स्पर्धेसाठी भूपेश कुळवे, मोहनदास चहारे, राजू वेलादी, लता बोबाटे, मेश्राम, सतीश बाळराजे, बदकल, देवतळे, आत्राम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रदीप भुरसे यांनी केले. संचालन अनुराधा डाखरे यांनी केले, तर आभार आनंद दुधे व दिलीप बोधे यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular