Friday, September 25, 2026
HomeChimurचिमूरमध्ये डॉ. अशोक नेते यांची सदिच्छा भेट; भाजप संघटनात्मक विषयांवर पदाधिकाऱ्यांशी सविस्तर...

चिमूरमध्ये डॉ. अशोक नेते यांची सदिच्छा भेट; भाजप संघटनात्मक विषयांवर पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

चिमूर, २५ सप्टेंबर २०२६ ::-माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी शुक्रवारी चिमूर येथे सदिच्छा भेट देत पक्षसंघटना, आगामी संघटनात्मक नियोजन तसेच स्थानिक विकासाच्या विविध विषयांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या दौऱ्यादरम्यान डॉ. अशोकजी नेते यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विधानपरिषदेचे माजी आमदार मितेशजी भांगडिया यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे तसेच जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून विकासकामांना गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. नेते यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक कामकाजाचा आढावाही घेतला.

दरम्यान, डॉ. अशोकजी नेते यांनी नेरी/भिसी भाजप मंडळ अध्यक्ष मनिष तुम्पल्लीवार यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. यावेळी स्थानिक संघटनात्मक परिस्थिती आणि पक्षाच्या आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी विधानपरिषदेचे माजी आमदार मितेशजी भांगडिया, नेरी/भिसी भाजप मंडळ अध्यक्ष मनिष तुम्पल्लीवार, चिमूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष संजय नवघडे, चिमूर भाजयुमो तालुका अध्यक्ष बालुभाऊ पिसे, ज्येष्ठ नेते चंदू बाळबुद्धे, माजी नगरसेवक तुषार शिंदे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे चिमूर विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular