VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याचे वनविभागाला निर्देश,
गडचिरोली, 25 सप्टेंबर 2026::- वसा–पोरला परिसरात हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कष्टाने उभी केलेली पिके हत्तींच्या कळपाने उद्ध्वस्त केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. हत्तींच्या उपद्रवामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांची व्यथा पाहून त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे विलंब न करता पूर्ण करावेत तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देश आमदारांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
हत्तींच्या उपद्रवामुळे झालेल्या नुकसानीची अचूक नोंद होणे आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई वेळेत मिळणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भाजप पदाधिकारी व वनविभागाचे अधिकारी उपस्थित :-
या पाहणीदरम्यान भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नदीप पाटील म्हशाखेत्री, सुजितजी राऊत, विलासजी खेवले, लोमेशजी कोलते, सुदर्शनजी धानोरकर, धनराजजी पोटे, संतोषजी चिंचोलकर, भोजराजजी भोयर, महेशजी कोटारे, घनशामजी गोहने, राजेंद्रजी राऊत, चंद्रहासजी भुसारी, रवीजी सेलोटे, शंकरजी इंगळे, पोलीस पाटील दहीकरजी तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
