VAINGANGA NEWS 24 (प्रतिनीधी – उज्वल देवनाथ)
चामोर्शी, १३ ऑक्टोंबर २०२३ ::- चामोर्शी तहसील अंतर्गत गड ग्रामपंचायत सुभाष ग्राम मैदान येथे काल दिनांक 12/10/2023 रोजी सायंकाळी 6 वाजता महिला गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला सुमारे 300 ते 400 महिला व तंटामुक्तीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
सुभाषग्राम येथील जेस्ट नागरिकांनी सहभाग घेऊन तंटामुक्तीच्या माध्यमातून सुभाषग्राम, ठाकूरनगर आणि नरेंद्रपूर या 3 गावातील गट ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला.वरील माहितीनुसार या परिसरात जो कोणी अवैध दारूचा व्यवसाय केल्यास त्याला 10 हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या समितीत घेण्यात येणार आहे, तनातमुक्ती अध्यक्ष विकास मंडळ, गौतम मंडल, गिरीश सरकार, नीलिमा बाच्छाड, त्यांच्यामार्फत दारूबंदी बाबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सुभाषग्रामचे सरपंच कृष्णा मंडळ, उपसरपंच उदय मंडळ सदस्य रेबा सरदार, बैठकीला पूर्णिमा बिस्वास, अनुप सिकदर, सती राय, दारूबंदी समितीच्या अध्यक्षा रेबा सरदार, सदस्य सुमित्रा हलदर, नीलिमा बच्छाड, नीला मजुमदार, बेबी कीर्तनिया, रंजिता देवनाथ, प्रमिला राय, बिंदा राय, मंजू राय, कमला आदी उपस्थित होते. भक्त, पारुल सरकार, मलिना मंडळ व सुभाषग्रामच्या गट ग्रामपंचायतीतील संपूर्ण नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून दारू विक्री व्यवसायावर बंदी आणली.
