VAINGANGA NEWS 24
प्रतिनिधी – उज्वल देवनाथ
सुभाषग्राम, २४ ऑक्टोंबर २०२३ ::- घोट येथून जवळ असलेल्या सुभाषग्राम येथे महिला बचत गटाच्या पुढाकारातून दारूबंदीवर आळा घालण्यासाठी महिलांनी चांगलीच कमर कसल्याने अवैधदारू विरोधात बंड पुकारला असून सुभाषग्राम व गुंडापल्ली येथील महिला बचत गटाच्या महिलांनी आक्रमक पद्धतीने दारूबंदी करण्यासंदर्भात पावली उचलली आहे अवैध दारुविक्रीमुळे सामाजिक सलोखा व आर्थिक परिस्थितीला महीला कोटूंबीक मानसिक छळाला समोर जावे लागल्याने महीलांनी मागील 10 दिवसापासुन दाऊ विक्रेता विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याने नवरात्राच्या उत्सवाहाच्या प पर्वावर या महिला रंणरागिणी ठरल्या असून त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे तूर्तास दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. सुरुवातीला दारू विक्रेत्यांना बंदीबाबत सूचना देऊन समजविण्यात आले व दारू नष्ट करून महिलांनी सुरुवात केली व त्यानंतर दारू विक्री केल्यास पोलीस कारवाई करण्याच्या इशारा दिला त्यातूनच सुभाषग्राम गुंडापल्ली येथील काही घरावर महिलांनीधाड टाकून अवैधदारू पकडून यासंदर्भात आष्टी पोलिसात माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यात आला सदर दारूबंदीसाठी सुभाषग्राम दारूबंदी समितीच्या अध्यक्ष रेबा सरदार, सचिव सुमित्रा हवालदार, सदस्य सरस्वती विश्वास, विशाखा मंडल, पूर्णिमा मंडल,काली राँय, अरुणा हालदार,हरिदासी सरकार,जरीना मृर्धा, शामली विश्वास,मनीषा साना तर गुंडापल्ली येथील सुरेखा पेंदोर, गोपिका दुर्गे, उषा सिडाम,मंदाबाई आत्राम,मीनाक्षी सिडाम, माधुरी आलाम,वर्षा सिडाम,वंदना कन्नाके आम्रपाली अलोणे,दीपा सिडाम,निता अलोणे आदी या महीलानी दारूबंदी समर्थनात एल्गार पुकाराला आहे नवरात्रीत महीला दारुबंदी उग्रअवतारांने दारुविक्रीतांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
