VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
गडचिरोली येथे वनमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन.
राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते गोटुल भूमीवर आदिवासी देवी देवतांची झाली महापूजा.
वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे गोटूल भूमीची जागा आदिवासी समाजाला देण्याची केली मागणी.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आदिवासी पारंपारिक नृत्यासह भव्य रॅलीने मंत्री सुधीरभाऊंचे केले स्वागत स्वागताला आदिवासी समाजाची तुफान गर्दी.
गडचिरोली, २४ ऑक्टोंबर २०२३ ::- मागील ४० वर्षांपासून सातत्याने चांदाळा रोड गडचिरोली येथील गोटुल भूमीवर आदिवासी समाज आपल्या देवी देवतांची पारंपारीक पद्धतीने पूजा अर्चना करीत असून काही स्वार्थी लोक केवळ राजकारणासाठी ही गोटुल भूमी आदिवासी समाजाला मिळू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत या गोटुल भूमीला विरोध केला ते भविष्यात पुढे कधी यशस्वी होऊ शकले नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराजा लॉंन गडचिरोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याच्या प्रसंगी केलें.
यावेळी मंचावर खासदार अशोकजी नेते, माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, गोटुल समितीचे जिल्हाअध्यक्ष नंदूभाऊ नरोटे , प्राध्यापक डॉक्टर श्याम कोरेटी ,डॉक्टर नरेश मडावी, डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, मा.आत्राम साहेब, भाजपा जिल्हा महामंत्री तथा गोटूल समितीचे प्रकाशजी गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लारवार ,जिल्हा सचिव दिलीप चलाख, धानोरा तालुका अध्यक्ष लताताई पुंगाटी, आदिवासी महिला नारीशक्ती संघटनेच्या लक्ष्मीताई कन्नाके येरमेताई मडावीताई , वर्षाताई शेडमाके, यांच्यासह मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते.
नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या स्वागतासाठी भव्य आयोजन करण्यात आल्याचे शहरात यावेळी दिसून आले. आदिवासी पारंपरिक नृत्याने रॅली सह इंदिरा गांधी चौकामध्ये सुधीरभाऊंचे आगमन झाल्यानंतर क्रेन साह्याने पुष्पहार व जेसीबीच्या साह्याने पुष्प वर्षाव करण्यात आला .त्यानंतर गोटुल भूमीवर सुधीर भाऊंच्या हस्ते आदिवासी देवी देवतांची पूजा करण्यात आली. त्यानंतर आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्याला माननीय आमदार सुधीरभाऊ यांनी मार्गदर्शन केले.
या जिल्ह्याचे अनेक ऋण आपल्यावर असून आपण जिल्ह्याची कोणतीही समस्या प्रथम प्राधान्याने सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सुधीरभाऊ म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की आपण आदिवासी समाजाच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून जिल्ह्यातील ग्रामसभांचे सक्षमीकरण व्हावे , बांबू व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. गोटुल भूमी ही आदिवासी समाजासाठी पवित्र भूमी असून ही जागा आदिवासी समाजाला देण्यात यावी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.
याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी खासदार अशोक जी नेते यांनीही उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू भाऊ नरोटे यांनी तर संचालक मोहन भाऊ पुराम यांनी केले.
