Saturday, May 23, 2026
HomeEtapalliश्री सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ बस स्थानक तथा समर्पण दुर्गा उत्सव...

श्री सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ बस स्थानक तथा समर्पण दुर्गा उत्सव मंडळ एटापल्ली तर्फे विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न…

VAINGANGA NEWS 24 प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार

एटापल्ली, २४ ऑक्टोंबर २०२३ ::- एटापल्ली तालुक्याचा मुख्य ठिकाणी श्री सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ बस स्थानक तथा समर्पण दुर्गा उत्सव मंडळ एटापल्ली तर्फे क्रिडा, सांस्कृतिक,शैक्षणिक व मनोरंजनात्मक महाउत्सव आयोजित करण्यात आले होते.या मध्ये मॅरेथॉन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, गरबा स्पर्धा,अंताक्षरी स्पर्धा, नृत्य स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा, आरती सजावट स्पर्धा होते.या मध्ये पारितोषिक म्हणून रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन स्पर्धेत सहभागी होऊन जिंकलेल्या स्पर्धकांना मा.शुभम मेहत्रे पोलीस उपनिरीक्षक एटापल्ली,मा.राघव सुल्वावार बांधकाम सभापती न.पं.एटापल्ली,मा.गिरावकर मॅडम पोलीस उपनिरीक्षक एटापल्ली,विजया पत्तीवार अध्यक्ष दुर्गा उत्सव मंडळ एटापल्ली,ममता खापणे उपाध्यक्ष,रेखा मोहूर्ले नगरसेविका तथा सचिव यांचा हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी नियोजक संपत पैडाकुलवार,उमेश संगर्ती अध्यक्ष समर्पण दुर्गा उत्सव मंडळ,रोहित बोमकंटीवार उपाध्यक्ष,राहुल कुळमेथे सचिव तथा नगरसेवक, अभिलाष नागुलवार सहसचिव, प्रशांत गजाडीवार अध्यक्ष,महेश पुल्लूरवार उपाध्यक्ष,संदीप सेलवटकर सचिव,संतोष गंधेशीरवार कोषाध्यक्ष,स्पर्धा प्रमुख राजेश हजारे,कनिका सरकार स्पर्धा महिला प्रमुख, कल्याणी नैताम स्पर्धा महिला सहप्रमुख तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.अमोल गजाडीवार सर यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular