VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,१९ -०१-२०२४::- रोज शुक्रवार ला महावितरण मंडळ कार्यालय गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्यामधील विद्युत क्षेत्रातील आज दिनांक 19/1/2024 रोज शुक्रवारला महावितरण मंडळ कार्यालय गडचिरोली येथे विद्युत क्षेत्रातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने काड्या फिती लावून पगारवढी संधर्भात निषेध नोंदविताना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीयविद्युत कर्मचारी संघटनेचे सर्कल अध्यक्ष सुधीर चौधरी.श्री राज राहुलगडे. अमित शेंडे. जे. सि. रामटेके एस.ई. ए. चे श्री सचिन कोहाड म. स्टे. ई. वर्क फेडरेशन चे श्री रंजन बल्लामावर तथा कृती समितीचे संपूर्ण पदाधिकारी व सभासदांनी सहभाग नोंदवला. तसेच कंपनीतील कार्यरत अधिकारी, अभियंते, कर्मचारी व सहाय्यक कर्मचारी यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने जिव्हाळ्याच्या प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या पगारवाढीच्या वाटाघाटी तात्काळ सुरू करून तोडगा काढण्याबाबत द्वार सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.सदर मंडळ स्तरावरील द्वारसभेमध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रविभागिय अध्यक्ष सुधीर चौधरी, प्रविभगिय सचिव जे .पी .मेश्राम सक्रिय सभासद श्री योगेश सलामे तसेच इतर सर्व सभासद, वी. क्षे. तां. का. संघटनेचे वाय.जे. कोडापे, म.रा.वि.का.महासंघाचे योगेश गोरे, एस. ई. ए. चे श्री. सचिन कोहाड, म. स्टे. ई.वर्क. फेडरेशन चे रंजन बलमवार तथा संयुक्त कृती समितीचे संपूर्ण पदाधिकारी आणि सभासद यांनी प्रचंड घोषणा व नारेबाजी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सभेमध्ये, संयुक्त कृती समितीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पगारवाढीसंदर्भात मार्गदर्शन करत सभासदांना संयुक्त कृती समितीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे जाहीर आवाहन केले तसेच प्रशासनाने समितीच्या सामान्य हक्काच्या मागण्या पूर्ण न केल्यास प्रचंड आंदोलन करण्यास असल्याचा इशाराही दिला.
