Saturday, May 23, 2026
HomeEtapalliमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती यांनी कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेची...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती यांनी कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेची उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/एटापल्ली,०२ मार्च २०२४::-तालुक्यातील तांबडा येथील युवा शक्ती क्रिडा मंडळ तांबडा टोला यांचे सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल आणि महिल कब्बड्डी स्पर्धेची आयोजित केली आहे.या कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं काँग्रेसचे नेते तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.त्यावेळी गावातील नागरिकांन कडून अजयभाऊंची जंगी स्वागत करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाची सहउदघाटक म्हणून काँग्रेस नेते व आविसं एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी होते.अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी आणि ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून सचिव प्रज्वल नागूलवार होते.

यावेळी उदघाटन प्रसंगी किष्टापूर ( वेल )ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,बबूराव मट्टामी,कपिल मट्टामी,पंकज भाडेकर,विलास पुगाटी,सोमजी गावडे,दरमा मट्टामी,दसरु मट्टामी,रागूनाथ रापट्टी,लालजी इचामी,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular