VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/एटापल्ली,१४ मार्च २०२४::-तालुक्यातील पिडींगुडाम येथील जय माँ काटी वेली पिंडीगुडम तर्फे प्रोढ ग्रामीण व्हॉलीबॉल व कब्बडी स्पर्धेचे आयोजित केली आहे.सदर या स्पर्धेची आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.
या कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा – शहीद क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके – माता सरस्वती प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गावातील आगमन होतच येथील स्थानिक नागरिक विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली.
या कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते प्रज्वलभाऊ नागूलवार – पिडींगुडाम गाव पाटील वंजा तलांडी – कुले तलांडी – जि.प.प्राथमिक व्यवस्थापक पिडींगुडाम जोगेश गावडे होते.
यावेळी उपस्थित महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वलभाऊ नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार.सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम,उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिकभाऊ तोगम,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
