VAINGANGA NEWS 24 प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार
गडचिरोली/एटापल्ली,१४ मार्च २०२४::-गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ एटापल्ली येथील आदिवासी परधान समाज संघटना यांचा सह परिसरातील गावातील जणआक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी एटापल्ली येथील शिवाजी चौक ते उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांचा कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला . या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती.
मोर्चा मध्ये उपस्थित आदिवासी परधान समाज संघटनेचे अध्यक्ष मां. योगेशभाऊ नागभिडकर तथा भा.ज.पा. महामंत्री ,
श्री. उमेश सिडाम, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ तलांदे, अध्यक्ष अहेरी जिल्हा निर्माण समिती
श्री. पुरुषो्तम सिडाम श्री. विजय आत्राम , श्री. कार्तिक कोडापे , स्वानंद मडावी , गोसावी तोरे , राजेश सडमेक, हरीश कुमरे, उज्ज्वल मडावी, उमेश पोरतेट रवींद्र पेंढारकर ,
या सोबत आदिवासी परधान संघटनेचे महिला शक्ती , याचा या सर्वप्रथम पुढाकार
सौ. भावना वसंत मडावी अध्यक्ष महिला संघटन परधान समाज संघटना एटापल्ली , सौ. नंदनी उमेश सिडाम , कु. अरुणा सीडाम , सौ ल. शांताबाई सिडाम , सौ. अश्विनी सिडाम, सौ. शुभांगी सिडाम सौ. सुमित्रा एकनाथ मडावी, सौ. काजल सदमेक, सौ. वनिता पोरतेट तसेच महिला संघटन समिती मधील सर्व महिला उपस्थित होते.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी याची मागणी उपविभागीय अधिकारी यांचा कडे करण्यात आली.
अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू
