VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
भाजपा आणि राजे फौंडेशनच्या कार्यकर्ते धावले मदतीला.
गडचिरोली/एटापल्ली,०३ ऑगस्ट २०२४::- मौजा एटापल्ली येथील अमुलु महारू कोवासे यास काल रात्री बैलाने त्याला मारल्याने त्याला जखम झालेला होता, तसेच मौजा गोलाकर्जी येथील पेंटा पोट्टी मडावी यांना लघवीचा त्रास असल्याकारणाने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे त्याचे ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने या दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यांना जायला पैसे नसल्याचे कळताच डॉ. संजय उमाटे (देव माणूस) म्हणून ओळखले जाणारे यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद जिल्लेवार,विकास तोडसाम, वाहन चालक अजय पुल्लुरवार यांना माहिती दिली असता त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता माजी राजे अम्ब्रीशराव महाराज यांना कळवल्यावर तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली.
यावेळी समस्त कोवासे व मडावी कुटुंबाने राजे साहेबांचे मानले आभार!
