
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
राज्य स्तरीय चषक विजेता व उपविजेता संघाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते बक्षीस व चषक देण्यात आले.
Gadchiroli/ चामोर्शी,२५ ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील मौजा सुभाषग्राम येथे नेताजी सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ च्या वतीने राज्य स्तरीय फुटबॉल प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शारीरिक तंदुरुस्तीची मोठी भूमिका असते. तग धरण्याची क्षमता, वेग, ताकद आणि चपळता हे खेळपट्टीवर खेळाडूच्या एकूण कामगिरीमध्ये योगदान देतात. या मूलभूत कौशल्यांमध्ये खेळाडू मैदानावरील त्यांची कामगिरी मध्ये सातत्य राखु शकतात. या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उपस्थित राहून विजेता संघ ओडिसा व उपविजेता चंद्रपूर संघाला चषक व रोख रक्कम देण्यात आले* *याप्रसंगी मंचावर निखिल भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबोध जी बिश्वास,राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपकजी हलदार, बिनाताई होळी, सरपंच क्रिष्णा मंडल, डॉ. रंजित मंडल, रबीन शहा, जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी सुरेश शहा, निर्मलेंदू हलदार, पो. नि. विशाल काळे, माजी जी. प. सदस्या शिल्पाताई रॉय, महिला आघाडी तालुका अध्यक्षा अनिताताई रॉय, माधवीताई पेशंट्टीवार, माजी उपसरपंच सतीश रॉय, मंडळाचे अध्यक्ष निरंजन बाछाळ, संतोष रॉय, विष्णू सरकार, अनुप भद्रा, तथा आयोजक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
