Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा.खा.अशोकजी नेते यांच्यासह भाजपा नेत्यांनी केले...

गडचिरोलीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा.खा.अशोकजी नेते यांच्यासह भाजपा नेत्यांनी केले अभिवादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,११ फेब्रुवारी २०२५ ::- एकात्म मानववादाचे प्रणेते, संघटन कर्ते आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी शतशः नमन करत त्यांनी उपाध्यायजींना अभिवादन केले.हा कार्यक्रम गडचिरोली येथील मा.खा. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय, चामोर्शी रोड येथे संपन्न झाला. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, ज्येष्ठ नेते गजानन येंगदलवार, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे, माजी न.प. उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर,शहर महामंत्री विनोद देवोजवार,अविनाश विश्रोजवार, श्यामभाऊ वाढई, राकेश राचमलवार, राहुल पोरेङिवार,लोमेश कुळमेथे, बंडुभाऊ नैताम, अरुण नैताम यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मा.खा.अशोकजी नेते यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारधारेचा उजाळा घेत, त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार समाजहिताच्या कार्याचा संकल्प व्यक्त केला. एकात्म मानववादाची संकल्पना आणि अंत्योदयाच्या ध्येयावर आधारित समाजसेवा हाच खरा राष्ट्रधर्म असल्याचे विचार यावेळी मांडण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular