Wednesday, June 17, 2026
HomeGadchiroliसंकल्प ते सिद्दी"विकसित भारत का अमृतकाल" बुद्धिजीवी संमेलनात भाजपाच्या विचारधारेचे मंथन -...

संकल्प ते सिद्दी”विकसित भारत का अमृतकाल” बुद्धिजीवी संमेलनात भाजपाच्या विचारधारेचे मंथन – मा.खा.डॉ. अशोकजी नेते_यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

“विकसित भारत का अमृतकाल” — गडचिरोलीत ‘प्रोफेशनल मीट’ बुद्धिजीवी संमेलन उत्साहात संपन्न,

स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,

गडचिरोलीदि. २० जून २०२५::- शुक्रवारप्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर देशभरात “संकल्प ते सिद्धी” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने ‘प्रोफेशनल मीट – बुद्धिजीवी संमेलन’ आज स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले.

या विशेष संमेलनात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे यशस्वी अकरा वर्ष जनतेपर्यंत पोहचविण्याचा हेतू होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी “संकल्प ते सिद्धी” अंतर्गत केंद्र सरकारच्या यशोगाथेची चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली, ज्याचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले – “भाजपा ही केवळ राजकीय संस्था नाही, ती राष्ट्रहिताची विचारधारा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने पारदर्शक प्रशासन, सामाजिक समावेश आणि गरीब कल्याणाच्या दिशेने अभूतपूर्व प्रगती केली आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ ही घोषणा नव्हे, तर ती आमची कार्यसंस्कृती आहे. गडचिरोलीसारख्या अतीदुर्गम भागात मि दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे केली यात गडचिरोली वडसा रेल्वे प्रकल्प, जिल्हयात रेल्वेचे जाडे,मेडिकल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, सुरजागड लोह प्रकल्प, चिचडोह ,कोटगल बँरेजेस, नॅशनल हायवेची कामे,एकलव्य विद्यालय असे विविध विकासाचे कामे मी केलेले आहे.

या जिल्यातील भागाचा विकास पोहचलेला आहे, हे दृढ राजकीय इच्छाशक्तीचे यश आहे.”असे प्रतिपादन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मान्यवर:

आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजपा जिल्हा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, महिला मोर्चा ओबीसी प्रदेश सचिव संगीताताई रेवतकर (राऊत),महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण,ज्येष्ठ नेते व माजी तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर,तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार,तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे,शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर,प्रा. सचिनजी चिचघरे,भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर,माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,युवा नेते आकाश गेडाम,अ‍ॅड. विजय चाटे,रेवनाथ कुसराम,नरेश अल्सावार, यश गण्यारपवार, प्रा.उराडे सर, याशिवाय भाजपाच्या विविध आघाड्यांचे मान्यवर पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील विविध बुद्धिजीवी उपस्थित होते.

.या कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, बाबुरावजी कोहळे, प्रा.सचिन चिचघरे या सर्व मान्यवरांनी शैक्षणिक, आरोग्य, कायदेशीर, व्यवसायिक व सामाजिक क्षेत्रातील अनुभवांची मांडणी करत केंद्र सरकारच्या कारकीर्दीचे सकारात्मक विश्लेषण केले. भाजपा सरकारच्या विविध योजनांचा सामान्य नागरिकांना लाभ कसा मिळाला, यावर प्रामाणिक चर्चा झाली.कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी जिल्हा संघटनेचे कौतुक मानयवरांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कार्याची प्रबोधनात्मक माहिती गडचिरोली जिल्ह्याच्या बुद्धिजीवी वर्गापर्यंत पोहोचविण्यात यश आले.या कार्यक्रमाची सांगता भारत माता कि जय व राष्ट्रगीत गायत झाली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular