Friday, May 22, 2026
HomeGadchiroliविधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक - 2026...

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक – 2026…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोडल अधिका-यांची बैठक,

गडचिरोली ,२२ मे २०२६::- वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूकीकरीता विषयनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांची आज (दि.21) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर वसुमना पंत यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, शुभम दांडेकर, अतुल जटाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखडे आणि वर्धाचे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, प्रत्येक नोडल अधिका-यांनी आपापली जबाबदारी अतिशय गांभिर्याने पार पाडावी. तिनही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय येथे मतदान केंद्र ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तेथे सीसीटीव्ही, वेब कास्टिंग व इतर व्यवस्था चोख ठेवाव्यात. निवडणुकीच्या कामाकरीता आपापले मनुष्यबळ तपासून घ्यावे. अचूक मतदार यादी तयार करण्याला प्राधान्य देऊन नावाच्या अग्रक्रमानुसार मतदार यादी त्वरीत चंद्रपूर येथे पाठवावी, अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular