VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र /मुंबई, १७ जुलै २०२५::- नियम २९३ अंतर्गत सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा होत असताना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रामदास मसराम यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
आमदार रामदास मसराम यांनी स्थानिक जनतेच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तसेच आदिवासी भागातील विकासाच्या प्रलंबित कामांवर सरकारचे लक्ष वेधले. तसेच शिक्षण, आरोग्य, शेती व रोजगार निर्मिती यांसारख्या तातडीच्या विषयांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
आमदार मसराम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी. शासनाने दुर्लक्षित भागांना न्याय देणे गरजेचे आहे.”*चर्चेदरम्यान त्यांनी मतदारसंघातील *रस्ते, वसतिगृहे, सिंचन प्रकल्प व पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत* या विषयांवरही ठोस सूचना मांडल्या.
