Monday, June 8, 2026
HomeGadchiroliजिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावा – आ. डॉ. मिलिंद नरोटे यांचे...

जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावा – आ. डॉ. मिलिंद नरोटे यांचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना निवेदन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा,

गडचिरोली, १५ सप्टेंबर २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या विविध मागण्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी निवेदन देत सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान आष्टी–आलापल्ली व आलापल्ली–सिरोंचा महामार्गाचे संथ गतीने सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या महामार्गांच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार नरोटे यांनी सांगितले.

तसेच गडचिरोली–धानोरा महामार्गाचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. धानोरा तालुक्याला आदिवासी भूगोल म्हणून ओळखले जाते आणि येथे रस्त्यांच्या समस्या गंभीर आहेत. धानोरा–मुरूम मुख्य रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावून सुरू करण्याबाबतही निवेदन देण्यात आले.

याशिवाय चामोर्शी–हरणघाट–मुल या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन तातडीने काम सुरू करण्याची मागणी निवेदनात नोंदविण्यात आली. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना दळणवळणात मोठ्या अडचणी येत असल्याचे नमूद करण्यात आले.गडचिरोली–आरमोरी हा महामार्ग हा गडचिरोलीला नागपूरशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे.

या मार्गावरील वाढत्या वाहतुकीचा विचार करून महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे व दर्जेदार रस्त्याची सोय करण्यात यावी, अशी मागणीही आमदार नरोटे यांनी केली.तसेच गडचिरोली शहरातील वाढत्या ट्रॅफिकचा व वारंवार होणाऱ्या अपघातांचा विचार करून शहरासाठी रिंग रोड मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघाताचे प्रमाण घटण्यास मदत होईल, असे आमदार नरोटे यांनी सांगितले.

आ. डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार रस्ते ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. या कामांमुळे जिल्ह्यातील संपर्क व्यवस्था सुधारेल, वाहतूक सुलभ होईल तसेच सर्वसामान्य नागरिकांना थेट दिलासा मिळेल. गडचिरोलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही चर्चा व निवेदन निश्चितच उपयुक्त ठरेल.”या चर्चेसाठी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतजी साळवे, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, जिल्हा सचिव सारंगजी साळवे, तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, संजय कुंडू, बाळूभाऊ उंदीरवाडे व सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular