Friday, September 18, 2026
HomeSironchaमाजी खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याला यश – नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत...

माजी खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याला यश – नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मंचेरियालला मंजूर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/ सिरोंचा, २९ सप्टेंबर २०२५::- सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागपूर–सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा रामगुंडमऐवजी मंचेरियाल येथे देण्यास मान्यता मिळाली आहे.ही मागणी भाजपा बूथ कमिटी सदस्य, वार्ड क्र. ५ सिरोंचा शहर, लियाकत हुसेन शेख यांनी मा.खा. डॉ. नेते यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

प्रवाशांना होणाऱ्या प्रचंड गैरसोयीची दखल घेत मा.खा. डॉ. नेते यांनी संबंधित निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री मान. अश्विनी वैष्णव यांच्या स्वाधीन करून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत मंचेरियाल येथे थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रामगुंडम स्थानकावर थांबा असल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील प्रवाशांना थेट बससेवा उपलब्ध नसल्याने ऑटो वा टॅक्सीने महाग भाडे देऊन प्रवास करावा लागत होता.

मात्र आता मंचेरियाल येथे नियमित बस सेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार आहेत.या निर्णयामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण असून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या यशाबद्दल मा.खा. डॉ. नेते यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मान. अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या थांब्यामुळे सिरोंचा परिसरातील नागरिकांनीही मा.खा. डॉ. नेते यांचे हार्दिक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular