Tuesday, July 28, 2026
HomeSironchaसिरोंचा तालुक्यातील विविध पक्षांच्या तरुणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश...

सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षांच्या तरुणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास.

गडचिरोली / सिरोंचा,११ एफ्रिल २०२६::- सिरोंचा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या दूरदर्शी, विकासाभिमुख व जनहिताच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

सिरोंचा येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रमात या तरुण कार्यकर्त्यांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करत पक्षाची विचारधारा आणि विकासाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचत आहे. या कामामुळे प्रेरित होऊन मोठ्या संख्येने युवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत.

तरुणांच्या सहभागामुळे संघटन अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळेल.तसेच त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या तरुण कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचे आवाहन केले.

प्रसंगी याप्रवेश सोहळ्याला कुमार अवधेशराव बाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,माजी आमदार डॉ.नामदेव ऊसेंडी,संतोष पडालवार जिल्हा सचिव, श्रीनाथ राऊत तालुका अध्यक्ष, शंकर नरहरी जिल्हा उपाध्यक्ष, तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका पदाधिकारी/कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular