Tuesday, July 28, 2026
HomeSironchaआसरअल्ली येथे भव्य टेनिस बॉल ओपन ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण ...

आसरअल्ली येथे भव्य टेनिस बॉल ओपन ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण …

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून प्रथम पारितोषिक,

गडचिरोली /सिरोंचा,१२ मार्च २०२६::- तालुक्यातील आसरअल्ली गावात आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल ओपन ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहात पार पडला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण कार्यक्रमाद्वारे गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी माजी मंत्री तथा *आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम* यांच्या वतीने प्रथम पारितोषिक म्हणून ३१,००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाला सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक सतीश बोगे, शहराध्यक्ष रवी सुलतान, कार्याध्यक्ष मदनाय्य मदेशी, अल्पसंख्याक अध्यक्ष जूगूणु भाई, कार्यकर्ता गफूर भाई तसेच गावातील क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेच्या आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आहे,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular