Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliपि एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ कारागीरांनी घ्यावा - इंजि. प्रमोदजी...

पि एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ कारागीरांनी घ्यावा – इंजि. प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

पि.एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने च्या वतीने कारागीरांची कार्यशाळा व जनजागृती मेळावा संपन,

गडचिरोली,०५ ऑक्टोबर २०२५::- दिनांक 03/10/2025 ला MSME(विकास कार्यालय) नागपूर व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विकास मंडळ यांच्या वतीने पि एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने चा फायदा सुतार, लोहार, सोनार,शिंपी कारागीर, शेतकरी कामगार वर्गाला होणार आहे,ट्रैनिंग घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार कारागीराना रुपये पंधरा हजाराची टूल किट मोफत मिळणार आहे,आपल्या व्यवसाय वाढविण्यासाठी कारागीरांना एक लाखा पर्यंतचे कर्ज फक्त 5% ते 6% व्याज दराने 18 महिन्या साठी मिळणार आहे.

तरी सर्व वर्गातील कारागीरांनी, पि एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजणांचा लाभ ग्यावा असे आपल्या मार्गदर्शनात मा. श्री प्रमोद पिपरे, सुकानू समिती सदस्य पि एम विश्वकर्मा कौश्यल्य योजना तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

उपस्थित विश्वकर्मा लाभार्त्यांना येणाऱ्या अडिअडचणी, लेखा तसेच बाजार पेटेकारिता मार्गदर्शन खालील मान्यवरांनी केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री धोंगडे, जिल्हा अग्रनी मॅनेजर बँक ऑफ इंडिया,श्री विद्याधर खरे असिस्टंट डायरेक्टर MSME नागपूर, भास्कर मेश्राम जिल्हा मॅनेजर गडचिरोली जिल्हा खादी व ग्रामधोग मंडळ, श्री काकपुरे साहेब बँक ऑफ इंडिया व मंडळाचे कर्मचारी तसेच जिल्हातील कारागीर वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular