VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ शिरपूर चा स्त्युत उपक्रम,
गडचिरोली/कुरखेडा, ०५ ऑक्टोबर ::- कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ शिरपूर तर्फे मोठ्या उत्साहात नवरात्र दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला. या नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या काळात विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यामध्ये विशेष दांडिया नृत्य, गोंडी नृत्य, करसाळ नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा माजी आमदार डॉ. देवराव होळी साहेबांच्या हस्ते पार पडले. सोबत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे, चांगदेव फाये कुरखेडा तालुका अध्यक्ष भाजपा, रुपाली कावळे जिल्हा महामंत्री भाजपा, हरिभाऊ कोकोडे, लिना कोकोडे, रविंद्र मडावी, सुनीता दाखणे, शिरपूर ग्रामपंचायत च्या सरपंच कुरेशाताई मडावी, ग्रामसेवक दुपारे, कल्पना मांडवे, गंधा बन्सोड, विश्वनाथ बन्सोड मुख्याध्यापक, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या नवरात्री निमित्य या गावातून बाहेर गावी लग्न झालेल्या मुलींना माहेर भेट व या गावात लग्न करून आलेल्या मुलींना सासर भेट म्हणून साडीचोळी देऊन सत्कार करण्यात येते.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी आयोजित समारोप व बक्षीस वितरण समारंभास डॉ. देवराव होळी, माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.या प्रसंगी माजी आमदार डॉ. होळी यांनी उपस्थितांना संबोधित करताना नवरात्र उत्सवाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले तसेच तरुणाईला समाजकार्यात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित केले. सोबतच शिरपूर गावात जो नववधूना मान दिला जातो, सत्कार करतात असा उपक्रम मला कुठेच आढळत नाही. हा फार छान उपक्रम असून प्रत्येक गावांनी असा उपक्रम सुरु करावा असे आव्हान उत्सवात शिरपूर परिसरातील नागरिक, महिला मंडळे व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
