VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मधुकर केशव भांडेकर यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निवेदन सादर,
गडचिरोली, ०२ नोव्हेंबर २०२५::- आधीच नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे सतत शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे त्यानंतर जिल्ह्यात काही दिवसापासून परतीच्या अवकाळी पावसामुळे सुरू असल्याने पावसामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे धान, तूर, भाजीपाला, कापूस आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे.
तरी खाली बाबींवर कारवाई करण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली शिष्टमंडळाने निवेदन दिले.
१) जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तत्काळ पंचनामे करून पिकांचे वास्तविक नुकसान नोंदवावे,
२) शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करून त्वरित वितरित करावी,
३) कर्ज हप्त्याच्या मुदतवाढ देऊन व्याज माफी देण्यात यावी,
४) पिक विम्याची दावे त्वरित निकाली काढून लाभ देण्यात यावे,
५) ज्यांचे धानाचे पीक पाण्यात भिजले आहे व काही पीक चांगल्या स्थितीत आहे त्या धानाला महामंडळ मार्फत खरेदी करण्यात यावा त्या धानाला हमीभाव देण्यात यावा,
६) शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी या संदर्भात तातडीने उपयोजना कराव्यात,
सदर बाबीची गांभीर्याने विचार करून सदर प्रकरणी तातडीने सकारात्मक कारवाही करण्यात यावी ही नम्र विनंती करण्यात आली.
माननीय जिल्हाधिकारी अविशांत पांड्या यांनी पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदू पेटेवार आकाश सातपुते जिल्हा महामंत्री अक्षय हेमके जिल्हा महामंत्री भाजयुमो प्रशांत कोटगले तालुकाध्यक्ष भाजयुमो साई सिल्लमवार शहर अध्यक्ष, अनिकेत विशरोजवार शहर महामंत्री, विशाल माळवे तालुका सचिव चामोर्शी तसेच भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.
