VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
डॉ. देवराव होळी यांचे नेतृत्व; हंसराज अहिर यांची उपस्थिती,
चंद्रपूर ,१४ जानेवारी २०२६::- एमएलई प्रभाग क्र. ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार हंसराज अहिर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. देवराव होळी यांनी प्रचार रॅलीदरम्यान मतदारांशी थेट संवाद साधत भाजप सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी भाजपाला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. डॉ. होळी यांचा जनतेशी असलेला जवळचा संपर्क आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे रॅलीत मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना हंसराज अहिर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या मार्गावर असून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचार रॅलीदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखालील या प्रचारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रभागात भाजपाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
