Friday, October 9, 2026
HomeChandrapurमतदार यादीतील कथित घोळाविरोधात चंद्रपुरात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी...

मतदार यादीतील कथित घोळाविरोधात चंद्रपुरात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते निषेध मोर्चात सहभागी,

चंद्रपूर, 09 ऑक्टोबर 2026::-मतदार यादीतील कथित अनियमितता आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून काँग्रेसने चंद्रपुरात जोरदार निषेध नोंदविला. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस नेते महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील आंदोलनातून काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा मुद्दा जोरकसपणे मांडला. दिल्ली येथे या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदारांशी प्रशासनाने केलेल्या कथित गैरवर्तनाचाही यावेळी निषेध करण्यात आला.

निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी :-

लोकशाही व्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार यादीतील कथित घोळाबाबत जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती :-

या निषेध मोर्चात खासदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, आमदार अभिजीत दादा वंजारी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवा राव, महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, दिनेश पा. चोखारे, शांतनु धोटे, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयजी गावंडे, नागभीड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, जुनेद खान, राम राऊत, विजयजी घरत, पुरुषोत्तमजी बघमारे, महेश कुर्जेकर आणि पंकजभाऊ गाडीवार यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार यादीतील कथित अनियमिततेची चौकशी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी या मुद्द्यांवरून चंद्रपुरातील या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसने आपली भूमिका ठामपणे मांडली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular