Sunday, September 13, 2026
HomeWardhराज्यस्तरावरील प्रमुख महत्त्वपूर्ण मुद्द्यावर शालेय शि. राज्यमंत्री मा. ना.पंकज भोयर यांच्याशी म....

राज्यस्तरावरील प्रमुख महत्त्वपूर्ण मुद्द्यावर शालेय शि. राज्यमंत्री मा. ना.पंकज भोयर यांच्याशी म. रा.प्रा. शि. संघाच्या शिष्टमंडळाची वर्धा येथे निवेदनातु मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

    महाराष्ट्र /वर्धा, ०२ मार्च २०२६::- TET, संचमान्यता,B.L.O.सह इतर अशैक्षणिक कामे इत्यादी राज्यस्तरावरील प्रमुख महत्वपूर्ण मुद्यांवर शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र शासन मा.ना.श्री पंकज भोयर साहेब यांचेशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची वर्धा येथे दिनांक १ मार्च २०२६ ला प्रत्यक्ष भेट व चर्चा.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची मा.ना.श्री पंकज भोयर साहेब,शालेय शिक्षण राज्य मंत्री, महाराष्ट्र शासन यांचेशी राज्य स्तरावरील महत्वपुर्ण मुद्यांवर दिनांक :- १/०३/२०२६ ला प्रत्यक्ष भेट आणि निवेदन देऊन सविस्तर सकारात्मक चर्चा .

निवेदनातील बाबी :- 

१) शिक्षण संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T.) अनिवार्य असल्याबाबतचे दिनांक १९/०१/२०२६ चे पत्र रद्द करून मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाप्रमाणे दोन वर्ष कालावधीत T.E.T. उत्तीर्ण होण्याच्या अटीचे अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी.

२) B.L.O. सह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घेण्यात यावे.                          

३) १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावे.

    निवेदनातील वरील नमूद महत्वाचे विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री लोमेश व-हाडे साहेब,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर,जिल्हा सरचिटणीस श्री अशोक रायसिडाम सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वर्धा चे जिल्हाध्यक्ष श्री अरुण झोटींग सर, वर्धा जिल्हा सरचिटणीस श्री सुनिल कोल्हे सर,वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन बटाले सर, यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular